इंदुरमध्ये इमारत कोसळून 10 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 1 एप्रिल 2018

इंदुरमधील सार्वेट बस स्थानकाजवळ 60 वर्ष जुनी ही इमारत होती. इमारतीची अवस्था खराब झाली होती. या दुर्घटनेत दोन महिलांसह दहा जण ठार झाले आहेत. दुर्घटनेनंतर 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शनिवारी रात्री इमारत कोसळून दहा जण ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरमधील सार्वेट बस स्थानकाजवळ 60 वर्ष जुनी ही इमारत होती. इमारतीची अवस्था खराब झाली होती. या दुर्घटनेत दोन महिलांसह दहा जण ठार झाले आहेत. दुर्घटनेनंतर 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमींवर एमवाय शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारने इमारतीच्या मुख्य कॉलमला धडक दिल्याने इमारत कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. इमारतीचा ढिगारा हलविण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचे, पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

Web Title: building collapse in Indore 10 people dead