या सरकारच्या काळात 18 लाख घरे बांधली : पंतप्रधान 

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

''जन धन योजनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशात 5 कोटी बँक खाते उघडण्यात आली आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 लाख घरे बांधण्यात आली''. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मिर्झापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर दौऱ्यावर आहेत. येथे रॅलीत उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले, ''जन धन योजनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशात 5 कोटी बँक खाते उघडण्यात आली आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 लाख घरे बांधण्यात आली''. 

उत्तरप्रदेशच्या पूर्वेत्तर भागातील मिर्झापूर रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी एनडीए सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, देशातील गरिब जनतेला दारिद्र्यापासून दूर करण्यासाठी एनडीए सरकार विविध योजना आणत आहे. तसेच या गरिब जनेतसाठी केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना (एनएचपीएस) लवकरच आणणार आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक महिलांना चुलींपासून पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या महिलांना कुटुंबीयांसोबत वेळ मिळत आहे. तसेच जन धन योजनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशात 5 कोटी बँक खाते उघडण्यात आली आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 लाख घरे बांधण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

दरम्यान, मिर्झापूरच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी बनसागर कॅनल प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. तसेच गंगा नदीच्या पुलावर असलेला बालुघाट, चुनरही अर्पण केला. ते म्हणाले, नुकत्याच मिळालेल्या आंतरराष्ट्रीय अहवालात पाच कोटी जनता मागील दोन वर्षांपासून दारिद्र्य रेषेच्या बाहेर गेली आहे. हे सरकारच्या योजनांचे फळ नाही का ?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. 

 

Web Title: Built 18 lakh homes during this government says PM Modi