'माझ्या कर्माचं फळ', चिठ्ठी लिहून महिला सब इन्स्पेक्टरची आत्महत्या

टीम ई सकाळ
Saturday, 2 January 2021

महिला सब इन्स्पेक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकरा उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून त्यात इतर कोणी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.

बुलंदशहर - उत्तर प्रदेशात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महिला सब इन्स्पेक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकरा उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून त्यात इतर कोणी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. 

पोलिसांनी महिला सब इन्स्पेक्टरचा मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनुपशहर पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेली महिला सब इन्स्पेक्टर आरजू पंवार एका गावात भाड्याच्या घरात राहत होती. तिने गुरुवारी रात्री उशिरा ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री सातच्या सुमारास ड्युटीवरून परतली होती. रात्री 9 वाजेपर्यंत जेवण्यासाठी खोलीतून बाहेर पडली नव्हती.

हे वाचा - धक्कादायक! नव्या नियमानुसार काश्मीरचा रहिवासी बनला पण दहशतवाद्यांनी केली हत्या

जेवणासाठीही  बाहेर न आल्याने घरमालक विचारण्यासाठी गेले असता दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता महिला सब इन्स्पेक्टर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. घरमालकेना हा प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या खोलीत एक चिठ्ठीही सापडली असून त्यावर हे माझ्या कर्माचं फळ आहे असं लिहिलं आहे. 

आरजू मुळची शामली इथली होती. 2015 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून ती भरती झाली होती. सध्या ती अनुपशहर पोलिस ठाण्यात तैनात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bulandshahar women sub inspector suicide