धक्कादायक! नव्या नियमानुसार काश्मीरचा रहिवासी बनला पण दहशतवाद्यांनी केली हत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जमीन कायद्यात बदल झाले आहेत. या नव्या कायद्यानुसार सर्वात पहिलं रहिवासी प्रमाणपत्र घेतलेल्या सतपाल निश्चल यांचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जमीन कायद्यात बदल झाले आहेत. या नव्या कायद्यानुसार सर्वात पहिलं रहिवासी प्रमाणपत्र घेतलेल्या सतपाल निश्चल यांचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यात निश्चल यांचा मृत्यू झाल्यानं व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. निश्चल हे काश्मीरमध्ये पहिले रहिवासी प्रमाणपत्र घेणारी व्यक्ती होते. 

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 17 वर्षांपासून ते सरायबाला इथं भाडेकरू म्हणून राहत होते. निश्चल यांनी कष्टाच्या जोरावर यश मिळवलं होतं. त्यांनी श्रीनगरमधील उच्चभ्रू वस्तीत घर उभारलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते इथं राहत होते. भूमी कायद्या बनल्यानंतर सतपाल निश्चल आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकतंच रहिवासी प्रमाणपत्र मिळालं होतं. निश्चल यांनी भूमी कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपलं आणि कुटुंबाचं रहिवासी प्रमाणपत्र तयार करून घेण्याचा निर्णय घेतला होता आणि ते मिळालंही होतं. 

हे वाचा - शेतकरी आंदोलक कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार, पेच सुटण्याची शक्यता

या प्रकरणात रहिवासी प्रमाणपत्रामुळेच खून झाल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवाद्यांनी सतपाल यांचा खून करून असाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी रहिवासी प्रमाणपत्र घेण्याचा विचार जरी केला तरी त्यांची अवस्था वाईट करू. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानं बाहेरच्या राज्यातील लोकांना मालमत्ता खरेदी आणि रहिवासी प्रमाणपत्र घेण्याचा कायद्याने हक्क मिळाला होता. याला काश्मीरमध्ये विरोधही करण्यात आला होता. 

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

पोलिस सध्या सतपाल निश्चल यांच्या खूनाचा तपास करत आहेत. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र बहुतांश काश्मीरी लोकांचे म्हणणे आहे की, हा खून काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना भीती घालण्यासाठी करण्यात आला आहे. सतपाल यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी सरायबाला इथं त्यांचे शेजारी असलेले शाबिर अहमद गेले होते. त्यांनी सांगितलं की, आम्ही मिळून कित्येक सण, उत्सव साजरे केले. सतपाल यांच्या हत्येनं मोठा धक्का बसला असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kashmir punjabi jweller satpal nischal killed bye terrorist after get domicile certificate