बुलंदशहरमधील 'त्या' पोलिसाची हत्या नव्हे आत्महत्या: भाजप आमदार

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे.

लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून घेतली होती. काही लोकांना या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यावेळी हा हिंसेचा प्रकार घडला त्यावेळी सर्वच लोकांकडे हत्यारे नव्हती आणि पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांना केवळ एकच गोळी लागली होती. सुबोध कुमार जेव्हा गर्दीत अडकले तेव्हा त्यांनी बचावासाठी आपल्या खांद्यावर गोळी मारून घेण्याचा प्रयत्न केला परंतु, चुकुन त्यांच्या डोक्याला गोळी लागली. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली होती. याप्रकरणात बजरंग दल आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Web Title: Bulandshahr cop shot himself resulting in death: BJP MLA shocks with new theory