बुलंदशहर हिंसाचार; मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा कट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार  मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला. यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत.

शिरोडकर समितीचा हा अहवाल उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, आता हा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. बुलंदशहरमध्ये झालेला हा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग होता, हे सिद्ध करण्यासाठी 48 तास जुना गायीचा सांगाडा असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. हा सांगाडा झालेल्या हिंसाचाराचे मूळ होता. या हिंसाचारादरम्यान पोलिस अधिकाऱ्यासह एका तरूणाचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख योगेश राज यांनी सयाना गावात गोहत्या झाल्याचे सांगितले. मात्र, याबाबतची शक्यता कमी असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, योगेश राजने याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, तरीदेखील त्यादरम्यान जमावाने रास्तारोको मागे घेतला नाही, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

Web Title: Bulandshahr Violence Mob Wanted Clash With Muslims