
कडक उन्हात उभा केलेली बुलेट सुरू करताच आग लागल्याची घटना घडली. यात बुलेट जळून खाक झाली. यासोबत शेजारी उभा असलेली स्कुटीसह आणखी दोन दुचाकी जळाल्या. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातली ही घटना आहे.