Bulli Bai: GitHub ऍपवर मुस्लिम महिलांचा लिलाव; राहुल गांधी म्हणतात...

Bulli Bai: GitHub ऍपवर मुस्लिम महिलांचा लिलाव; राहुल गांधी म्हणतात...

नवी दिल्ली : मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणारे एक ऍप्लिकेशन अस्तित्वात असून त्याद्वारे महिलांचा विनयभंग केला जात असल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. दिल्लीमधील एका महिला पत्रकाराने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. महिला पत्रकाराचे छेडछाड केलेले फोटो अपलोड केल्याबद्दल या वेबसाइटविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आणि त्यानंतर अनेक राजकारण्यांनी त्याचा निषेध केला. दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi ) यांनी आज रविवारी मुस्लीम महिलांच्या 'लिलाव' करणाऱ्या एका ऍप्लिकेशन विरोधात ट्विट करत आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.

Bulli Bai: GitHub ऍपवर मुस्लिम महिलांचा लिलाव; राहुल गांधी म्हणतात...
Omicron : शाळा, सलून, मॉल्ससह सर्व बंद; बंगालमध्ये कठोर निर्बंध

महिलांचा अपमान आणि धार्मिक द्वेष तेंव्हाच बंद होईल जेंव्हा आपण सगळे एकासुरात आवाज उठवत याविरोधात ठामपणे उभे राहू. वर्ष बदललं आहे, अवस्थाही बदलू. आता बोलायलाच हवं. असं त्यांनी ट्विट केलंय. पुढे #NoFear असं देखील त्यांनी म्हटलंय.

आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (IT minister Ashwini Vaishnaw ) यांनी सांगितलंय की, हे अॅप ब्लॉक केले गेले आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे. "GitHub ने आज सकाळीच वापरकर्त्याला ब्लॉक केल्याचं सांगितलं आहे. CERT आणि पोलीस अधिकारी पुढील कारवाईबाबत प्रयत्नशील आहेत.

"आज सकाळी मला हे कळल्यावर धक्का बसला की bullibai.github.io नावाच्या वेबसाइट/पोर्टलवर (हटवल्यापासून) अयोग्य, अस्वीकार्य आणि स्पष्टपणे अश्लील संदर्भात माझे छेडछाड केलेले चित्र आहे. याबाबत त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. मला आणि इतर तत्सम स्वतंत्र महिला आणि पत्रकारांना त्रास देण्यासाठी हे डिझाइन केलेलं आहे,” अशी तक्रार त्या महिला पत्रकाराने केली आहे.

Bulli Bai: GitHub ऍपवर मुस्लिम महिलांचा लिलाव; राहुल गांधी म्हणतात...
Video: गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी!

दिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ (शब्द, हावभाव किंवा कृत्ये याद्वारे महिलेच्या शिष्टाचाराचा अपमान करणे) आणि ३५४ ए (लैंगिक छळ आणि छळाची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "बुल्ली बाई" पोर्टलवर अज्ञात लोकांकडून तिला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्या पत्रकार महिलेने केला आहे.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मुस्लिम महिलांना याप्रकारे लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, सुल्ली डील्स नावाचं असंच एक ऍप्लिकेशन तयार करण्यात होतं जे याच बुल्ली बाई ऍपचा (Sulli Deals -- Bulli Bai ) क्लोन असल्याचे मानलं जातं. महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मुस्लिम महिलांचे फोटो गोळा करून त्यांचा 'लिलाव' करण्याचा प्रकार या ऍप्लिकेशनवर होतो. दोन्ही अॅप्स GitHub वर अज्ञात गटांनी तयार केले होते. सुल्ली डीलच्या वादात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com