Video | गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bedrooms for 3 cows in House
Video | गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी!

Video: गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी!

Special Bedrooms for 3 cows in House: अलीकडच्या काळात राहायला साधं घर मिळणं किती कठीण झालंय हे सांगायची गरज नाही, मग प्रत्येकाला बेडरुम वगैरे भेटणे तर दूरच राहिले. परंतु राजस्थानच्या जोधरपूरमधील (Jodhpur- Rajasthan) एका कुटुंबानं चक्क आपल्या गायींसाठी स्वतंत्र बेडरूम बनवल्या आहेत. या सर्व बेडरुम्स फर्निचरसह (Well furnished bedrooms for cow) आहेत. गायींच्या या बेडरुममुळे हे कुटूंब सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) झालं आहे. राजस्थानमधील या कुटूंबानं आपल्या तीन गायींना गोठ्यात न बांधता त्यांच्यासाठी घरातच बेडरूम बनवल्या आहेत. विशेष म्हणजे गायींसाठी एक वैयक्तिक बेडरूम आणि झोपण्यासाठी वैयक्तिक बेड देखील आहे.

हेही वाचा: VIDEO: सॅल्युट! इंडियन आर्मीच्या वीर जवांनाचं New Year सेलिब्रेशन बघाच

हा व्हिडिओ दोन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, जो लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसत आहे. या व्हिडीओ क्लिपला 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. या कुटुंबाच्या इंस्टाग्राम हँडलचे नाव @cowsblike आहे, ज्यावर ते त्यांच्या तीन गायींचे (गोपी, गंगा आणि पृथू) गोंडस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

हेही वाचा: Video: मित्राला झोका द्यायला गेला दरीत पडता पडता वाचला!

या व्हायरल क्लिपमध्ये एक गाय घराच्या बेडवर पडलेली दिसत आहे. तिला थंडी जाणवू नये म्हणून तिने चादरही पांघरली आहे. त्याचप्रमाणे इन्स्टा यूजरने त्यांच्या गायींची काळजी घेण्याचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, जे लोकांना खूप आवडतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top