Bullock Cart race : पुन्हा उडणार धुरळा! बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा? ॲनिमल वेल्फेअर बोर्ड सकारात्मक

सुप्रीम कोर्टात आज बैलगाडा शर्यतींबाबत याचिकेवर सुनावणी पार पडली.
bullock cart
bullock cartsakal

मुंबई : बैलगाडा शर्यतींबाबत पुनर्विचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यावेळी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ॲाफ इंडिया बैलगाडी शर्यतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं. बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची गरज नाही, असं सांगत ॲनिलम वेल्फेअर बोर्डानं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामुळं आता राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. (Maharashtra Bullock Carts race way for races is finally clear animal walfare bord readty for it)

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींबाबत दाखल विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. यापूर्वी सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. पण त्यानंतर याविरोधात पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

यावेळी CUPA या प्राणी मात्रा संघटनेच्यावतीनं ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा यांनी बाजू मांडली. तर महाराष्ट्र सरकारच्यावतीनं ॲड.सिद्धार्थ धर्माधिकारी, ॲड. पांडे यांनी बाजू मांडली. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीनं ॲड. आनंद लांडगे आणि ज्येष्ठ वकील गौरव अग्रवाल देखील बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. यावर पुढील सुनावणी मंगळवारी पार पडणार आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे रामकृष्ण टाकळकर यांनी ही माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com