
नवी दिल्ली, ता. ९ (पीटीआय) : बसमधील आसनावर अन्न सांडले म्हणून एका व्यक्तीला वाहनचालक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण करत त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी आज सांगितले. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.