esakal | "लस खरेदीचं काम तुमचं, जनतेला देण्याचं आमचं"
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccine

"लस खरेदीचं काम तुमचं, जनतेला देण्याचं आमचं"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : दिल्लीसह देशभरात वाढत चाललेल्या कोरोनाच्या संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. केंद्राकडून सध्या पदेशातून लस खरेदी बंद असून याची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आली आहे, असं कसं चालेल? असा सवाल विचारताना "लस खरेदीचं काम तुमचं, तर जनतेला देण्याचं काम आमचं आहे", अशा शब्दांत केजरीवाल यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडलं. (buying vaccines you job its give it to public our job says Kejriwal)

केजरीवाल म्हणाले, "कोरोनाविरोधात लढण्यासाठी टीम इंडियाला सोबत यावं लागेल. हा देश लस का खरेदी करत नाहीए? आपण हे राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. जर पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला तर आपण राज्यांवरच सगळं सोपवणार का? युपी आपले रणगाडे खरेदी करेल का? की दिल्ली आपली हत्यारं खरेदी करेल?" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांकडून सक्तीनं पैसे वसुलीला बसणार चाप!

कोरोनाविरोधात केंद्राच्या सहकार्याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले, "आपण ही लढाई हारू शकत नाही. जर केंद्र सरकार ही लढाई हारत असेल तर भाजपं नव्हे तर भारत लढाई हारेल. मला पंतप्रधानांना हे विचारायचं आहे की जे काम राज्यांचं नाहीच ते काम राज्य सरकारं कशी करतील? जे काम केंद्र सरकारचं आहे ते केंद्र सरकारलाच करावं लागेल. आपण लस घेऊन ती राज्यांना द्या, जनतेला लस देण्याचं काम आमचं आहे, ते आम्ही करु"

भारतानं सहा महिने उशीरा लसीकरण सुरु केलं

पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना केजरीवाल पुढे म्हणाले, "भारतानं लसीकरण मोहिम सहा महिने उशीरा सुरु केली. जगभरातील इतर देशांनी आपल्या जनतेसाठी लसीकरण आधीच सुरु केलं होतं. पण त्यावेळी भारतानं आपल्या जनतेला लस देण्याऐवजी ती इतर देशांना पाठवली. जर आपण वेळेवर लसीकरण मोहिम सुरु केली असती तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण अनेक लोकांना वाचवू शकलो असतो." केंद्रानं राज्यांना स्वतःच लस खरेदी करायला सांगितल्याच यावेळी केजरीवालांनी सांगितलं.

राज्यांचे प्रयत्नही अपुरे पडतायतं

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लस इतर देशांकडून खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण कोणतंही राज्य लशींची व्यवस्था करु शकलं नाही. अनेक राज्यांनी ग्लोबल टेंडर काढले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच लस खरेदी करुन त्याचं राज्यांना वाटप करावं असं आवाहन त्यांनी केलं.