esakal | CAA:पाकिस्तानची महिला लढवतेय ग्रामपंचायत निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani woman contesting panchayat election in rajasthan

टोंक (राजस्थान) येथील नटवारा ग्रामपंचायत आता गावा पुरती मर्यादीत राहिलेली नाही तर, ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय.

CAA:पाकिस्तानची महिला लढवतेय ग्रामपंचायत निवडणूक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशभरात रान उठले असताना, या कायद्याशी निगडीत एक वेगळी घटना समोर आली आहे. पाकिस्तानातून (Pakistan) भारतात स्थलांतरीत झालेल्या एका महिलेनं निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष त्या निवडणुकीकडं लागलंय. राजस्थानातील (Rajasthan) एका गावात स्थायिक झालेली महिला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरलीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टोंक (राजस्थान) येथील नटवारा ग्रामपंचायत आता गावा पुरती मर्यादीत राहिलेली नाही तर, ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. कारण, गावातील एक उमेदवार मूळची पाकिस्तानची आहे. नीता सोधा असं त्या महिलेचं नावा असून, त्या 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात स्थलांतरीत झाल्या होत्या. त्यांना चार महिन्यांपूर्वीच भारतीय नागरिकत्व मिळालयं आणि आता त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीनं नटवारा गावाच्या निवडणुकीकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. 

आणखी वाचा - संजय राऊतांची तक्रार करायला राम कदम कुठं गेले पाहा!

मी 18 वर्षांपूर्वी भारतात स्थालंतारीत झाले आहे. मला भारताचे नागरिकत्वही मिळाले आहे. माझे सासरे मला, माझ्या राजकीय प्रवासात मार्गदर्शन करत आहेत. 
- नीता सोधा, ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार 

शिवसेनेची होती भूमिका
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना, शिवसेनेने वेगळी भूमिका मांडली होती. पाकिस्तान आणि इतर शेजारी राष्ट्रांमध्ये असणारे, हिंदू आपलेच आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे पण, मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा हक्क देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली होती. या कायद्याच्या आडून व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असं मत शिवसेनेनं मांडलं होतं.