संजय राऊतांची तक्रार करायला भाजप नेते राम कदम थेट कुठे गेलेत? वाचा..

संजय राऊतांची तक्रार करायला भाजप नेते राम कदम थेट कुठे गेलेत? वाचा..

मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना 'वंशज असल्याचा मागितलेला पुरावा' यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. अशात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. यामध्ये भाजपचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधायची एकही संधी विरोधीपक्ष भाजप सोडत नाही. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. याचसोबत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र डागलंय. काल सकाळीच भाजप नेते राम कदम हे देखील संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईतील घाटकोपरमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले होते. संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करा अशी मागणी राम कदम यांनी केलेली पाहायला मिळाली. 

राम कदम यांनी गाठलं कमिशनर ऑफिस 

याच संदर्भात राम कदम यांनी आज थेट मुंबईतील कमिशनर ऑफिस गाठलंय. भाजप आमदार राम कदम आज थेट मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेत. शिवसेना खासदार आणि प्रमुख नेते संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी राम कदम मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटलेत.

संजय राऊत यांनी छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे यांच्याकडे ते वंशज असल्याचा मागितलेला पुरावा आणि इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला भेटण्यास पायधुनीला जात असल्याचं केलेलं विधान, या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये न्याय न मिळाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार करण्यासाठी जात असल्याचं राम कदम म्हणालेत. 

BJP leader ram kadam went to meet commissioner office regarding sanjay rauts statement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com