CAA : उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण, पाच जण ठार

टीम ई-सकाळ
Friday, 20 December 2019

उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद असून, येत्या 22 डिसेंबरला होणारी शिक्षक भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

लखनौ : नागरिकत्व सुधारणा कायद्याला (Ciizenship Amendment Act) विरोधासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागले आहे. यात सहा जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिजनौर, मेरठ, संभल, फिरोजाबाद आणि कानपूरमध्ये प्रत्येकी एक बळी गेला आहे. दरम्यान, पोलिसांकडून गोळीबार करण्यात आलेला नाही, असा दावा करण्यात आलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परीक्षाच रद्द
उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद असून, येत्या 22 डिसेंबरला होणारी शिक्षक भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परिक्षेसाठीचे हॉल रिसिट 12 डिसेंबरपासून डाऊनलोड करण्याची मुदत देण्यात आली होती. जवळपास 95 टक्के रिसिट डाऊनलोड झाल्या आहेत. पण, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद असल्यामुळं परिक्षाच रद्द करण्यात आली आहे. राज्यात एकूण 16 लाख 58 हजार परिक्षार्थी बसणार होते. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधासाठी नागरिक रस्त्यावर आले आहेत. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आंदोलन तीव्र झाले असून, महाराष्ट्रातही काही ठिकाणी दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी कलम 144 लागू (जमावबंदी) करण्यात आले आहे. त्यामुळं अनेक शहरांत तणावाचे वातावरण आहे. आंदोलनाची तीव्रता दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वाधिक आहे. 

आणखी वाचा - CAA : देशभरातील वणवा शमेना; दिल्लीत धग कायम

आणखी वाचा - CAA : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचे पुन्हा आंदोलन

सुधारीत नागरिकत्व कायदा हा भेदभाव करणारा आहे. भाजपप्रणीत केंद्र सरकार कायद्याला असलेला विरोध दूर करण्यासाठी ताकदीचा वापर करत आहे. काँग्रेस पक्ष सामान्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि आमच्या राज्यघटनेतील मूलभूत मुल्ये टिकवून ठेवण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. 
- सोनिया गांधी, अध्यक्ष, काँग्रेस 

दिल्लीत 17 मेट्रो स्टेशन्स बंद
आज, दुपारी दिल्लीतील जामा मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र आला होता. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 17 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: caa protest gets violent in uttar pradesh five dead in clashes