esakal | CAA : हा कायदा गरिबांच्या विरोधात; प्रियंका गाधी इंडिया गेटवर
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader Priyanka Gandhi Vadra at a protest at India Gate

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलकांच्या समर्थनार्थ इंडिया गेटवर दाखल झाल्या आहेत. यावेळी नागरिकत्व कायदा (Ciizenship Amendment Act) हा गरिबांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. गरिब लोकांनांच त्याचा सर्वाधिका त्रास होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

CAA : हा कायदा गरिबांच्या विरोधात; प्रियंका गाधी इंडिया गेटवर

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलकांच्या समर्थनार्थ इंडिया गेटवर दाखल झाल्या आहेत. यावेळी नागरिकत्व कायदा (Ciizenship Amendment Act) हा गरिबांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. गरिब लोकांनांच त्याचा सर्वाधिका त्रास होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा कायदा आला तर, रोजंदारी करणारे लोक आपले जीवन कसे जगणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच, प्रियंका यांनी आपले आंदोलन आणि निदर्शने ही शांततेत करावीत अशा सूचना आंदोलनकर्त्यांना दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी सोमवारी (ता. १६) प्रियांका गांधी या इंडिया गेटवर गेल्या होत्या. तसेच नागरिकत्व कायद्याच्या विरोधात त्यांनी जामिया-मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना समर्थन देताना काहीवेळ धरणेही धरले होते.  


ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

दरम्यान, गरिकत्व कायद्यावरून देशभर जनक्षोभ उसळला असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याची मागणी केल्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. खुद्द पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनीच ममतांच्या विधानाशी असहमती दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांनीही त्यांच्यावर टीका केली.