CAB : विधेयकाविरुद्ध आसाम पेटले; अनेक ठिकाणी जाळपोळ, बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आसाम पेटले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी आंदोलने केली आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आला असून कडेकोट बंद पाळण्यात आला आहे.

गुवाहाटी - नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आसाम पेटले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी आंदोलने केली आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आला असून कडेकोट बंद पाळण्यात आला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे हे विधेयक असून ते काल (ता.०९) लोकसभेत पास झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणात आसाममध्ये विरोध करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या विधेयकाला आसाममधून तीव्र विरोध होत असून, अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाममध्ये नॉर्थ-ईस्ट स्ट्युडंस् ऑर्गनायझेशन आणि ऑल आसाम स्ट्युडंट्स युनियन या संघटनांनी 12 तासांचा बंद पुकारला आहे. या बंदचा प्रभाव मोठ्या प्रमाणाव दिसून येत आहे.
 

धक्कादायक : सीआरपीएफ जवानाचा अधिकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू

राज्यात ठिकठिकाणी दुकाने बंद असून काही ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडले होते त्यानंतर आज या विधेयकाच्या बाजूने 311 खासदारांनी मतदान केलं. तर, या विधेयकाच्या विरोधात 80 खासदारांनी मतदान केले. नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मतदानासाठी सादर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAB Assam protests against the Citizenship Amendment Bill