धक्कादायक : सीआरपीएफ जवानाचा अधिकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

झारखंडमध्ये सीआरपीएफच्या जवानांने केलेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात आणखी दोनजण जखमी झाले आहेत. बोकारो येथे सीआरपीएफच्या एक तुकडीत काल (ता. १०) उशीरा ही घटना घडली. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत

रांची : झारखंडमध्ये सीआरपीएफच्या जवानांने केलेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात आणखी दोनजण जखमी झाले आहेत. बोकारो येथे सीआरपीएफच्या एक तुकडीत काल (ता. १०) उशीरा ही घटना घडली. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

अधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या जवानाचे नाव दिपेंद्र यादव असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी ७ डिसेंबर रोजी गुमलामध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या गोळीबारातही एकाचा मृत्यू झाला होता.

 

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

 

तसेच, यापूर्वी छत्तीसगडमध्ये आयटीबीपीच्या रेहमान खान या जवानाने पाच जवानांची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच, या प्रकारानंतर त्याने स्वतःलाही गोळी मारून आत्महत्या केली होती. शिवाय अन्य तीन जण जखमी झाले होते. ही घटना रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटरवर असलेल्या नारायणपूर येथे आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या कडेनेर शिबिरात घडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two CRPF men killed 2 injured in Jharkhand fratricide incident

टॅग्स