शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्राने 14 पिकांसाठी वाढवला MSP

धानाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Farmar
Farmarsakal

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 हंगामासाठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मंजूर केली आहे. सध्या 2021-22 साठी एमएसपी 1940 रुपये प्रति क्विंटल आहे. धानाचा एमएसपी 2040 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून, धानाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur ) यांनी दिली आहे. (Cabinet Approves MSPs For Kharif Marketing Season 2022-23)

ठाकूर म्हणाले की, 2014 पूर्वी 1-2 पिकांवर खरेदी केली जात होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये उर्वरित पिकांचीही भर पडली आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. 2022-23 च्या खरीप विक्री हंगामासाठी 14 पिकांचा एमएसपी निश्चित करण्यात आला असून, धानाचा एमएसपी 2040 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. धानाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 100 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Farmar
PM मोदींच्या भाषणानंतर राकेश टिकैत म्हणे, आम्ही कुठं म्हटलं MSP होणार बंद

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिळाच्या किमतीत 523 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुगाच्या भावात प्रतिक्विंटल 480 रुपयांची वाढ होणार आहे. सूर्यफुलावर प्रतिक्विंटल 358 तर, भुईमुगाच्या दरात 300 रुपयांनी वाढ होणार आहे. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने तूर डाळीच्या एमएसपीमध्येही वाढ केली आहे. यावेळी तूर डाळीचाचा एमएसपी 6600 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून, गेल्या वेळेपेक्षा यंदा एमएसपी प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढवण्यात आल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com