

Cabinet Reshuffle
esakal
दिल्लीतील राजकीय वातावरणात सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. काही वृत्तांमध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर काहींच्या मते हा विस्तार अधिवेशनानंतर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयातील घडामोडींवर पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशातच दोन विद्यमान केंद्रीय मंत्र्यांनी भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.