esakal | कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये बीफ? व्हायरल मेसेजवर कंपनीने दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये बीफ? व्हायरल मेसेजवर कंपनीने दिलं स्पष्टीकरण

कॅडबरी चॉकलेमध्ये बीफबाबत जेव्हा मेसेज व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी कंपनीकडे याबाबत उत्तर मागितलं होतं.

कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये बीफ? व्हायरल मेसेजवर कंपनीने दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - सोशल मीडियावरून अनेक मेसेज व्हायरल होत असतात. त्यामध्ये बऱ्याचदा काही अफवा असतात. आताही असाच एक मेसेज व्हायरल होत असून त्यात डेअरी मिल्क कॅ़डबरीमध्ये बीफ असल्याचा दावा केला आहे. व्हायरल मेसेज खोटा असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला आहे की, ज्या उत्पादनात जिलेटिन असतं तो पदार्थ गोमांस वापरून तयार केला असा त्याच अर्थ होतो.

कंपनीकडून उत्तर देण्यात आलं आहे. कंपनीने म्हटलं की,'हा मेसेज संभ्रम निर्माण करणारा आहे. हे उत्पादन भारताशी संबंधित नाही. कंपनी भारतात विक्री करण्यात येणाऱ्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये बीफ किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मांस वापरत नाही.'

हेही वाचा: अदानी समूहातील कंपन्या SEBI च्या रडारवर, सरकारकडून संसदेत माहिती

कॅडबरी चॉकलेमध्ये बीफबाबत जेव्हा मेसेज व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी कंपनीकडे याबाबत उत्तर मागितलं होतं. कंपनीच्या अधिकृत ट्विटल हँडलला टॅग करून प्रश्न विचारण्यात आले होते. यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात म्हटलं की, शेअर करण्यात आलेला स्क्रीनशॉट हा भारतात तयार होणाऱ्या माँडेलेज उत्पादनांशी संबंधित नाही. चॉकलेटच्या रॅपरवर हिरव्या रंगाचं वर्तुळ असतं, त्यावरून भारतात तयार होणारी आणि विक्री होणारी सर्व उत्पादने ही 100 टक्के शाकाहारी आहेत.

कंपनीने लोकांना आवाहन केलं आहे की, कोणताही मेसेज शेअर करण्याआधी त्याच्याशी संबंधित माहिती खरी आहे की खोटी हे एकदा तपासून बघा. तुम्हाला माहिती आहे की नकारात्मक आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्टमुळे नामांकित ब्रँडबाबत ग्राहकांच्या मनात चुकीचे मत निर्माण होते. व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असलेल्या संकेतस्थळाचा युआरएल हा Cadbury.com.au असा आहे. याचाच अर्थ ही कंपनी ऑस्ट्रेलियातील आहे. त्याच्या आधारे भारतात अशा प्रकारचा दावा करणं चुकीचं आहे.

loading image