

Bakrid Sacrifice Rule
ESakal
पश्चिम बंगाल सरकारने बैल, वळू, गायी, वासरे आणि म्हशींच्या कत्तलीवर निर्बंध घालणाऱ्या नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत हस्तक्षेप करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा निर्णय आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर आला आहे. न्यायमूर्ती सुजॉय पॉल आणि पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ही अधिसूचना उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन करून जारी करण्यात आली आहे.