"इतना बडा कांड करुंगा की.."; विकास दुबे आणि पोलिसामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

vikas dube.png
vikas dube.png

नवी दिल्ली- गँगस्टर विकास दुबेचा १० जूलै रोजी पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. दुबे आणि एका पोलिसातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.  या ऑडिओमध्ये एक व्यक्ती जो की विकास दुबे मानला जात आहे पोलिस कर्मचारी राजीव चौधरी यांच्याशी संवाद साधत आहे. 2 जूलै  रोजी दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी चौधरीला निलंबित करण्यात आले होते. विकास दुबेने हल्ल्याची घटना घडण्याआधी  पोलिसाला फोन केला होता. खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी दुबे पोलिसाला धमकी देत असल्याचं ऑडिओमध्ये कळत आहे.

भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायलाच हवं; राम मंदिर ट्रस्टची भूमिका
फोन करणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत आहे की, इतका मोठा कांड करेन...तुला कळेल की तू कुणाशी पंगा घेतला आहे. संपूर्ण जीपच मारुन टाकेन..इतके खून करुन टाकेन. संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवीन. तू आता विकास दुबेचा टार्गेट आहेस. जोपर्यंत मारणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही, अशी धमकी विकास दुबे पोलिसाला देताना दिसत आहे. मात्र, या ऑडिओमध्ये नेमकं कोण बोलत आहे याची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.

दरम्यान, कानपूरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जेनमधून उत्तर प्रदेशच्या कानपूरला नेण्यात येत होते. तो ज्या वाहनात होता त्या वाहनाला अपघात झाला. यावेळी त्याने पोलिसांकडील हत्यार हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यापूर्वी दुबेचा सहकारी असलेल्या प्रभातसह अन्य काही जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता.

2000 मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणात विकास दुबे याच्यावर आरोप झाले होते. याचवर्षी रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे याची हत्या झाली होती. यातही विकास दुबेचा हात असल्याचे बोलले जाते. 2013 मध्ये त्याच्यावर गंभीर आरोप झाले.  विकास दुबे याच्या विरोधात 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.19 वर्षांपूर्वी विकास दुबे याने राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलिस स्टेशनमध्ये घुसून हत्या केली होती. दुबेने पोलिसांसमोर शुक्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, खुद्द पोलिसांनी दुबे विरोधात साक्ष दिली नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com