Video : खासदाराने लगावली कार्यकर्त्याच्या कानशिलात

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

बिजू जनता दलाचे (बीजेडी) खासदार चंद्रशेखर साहू यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भुवनेश्वरः बिजू जनता दलाचे (बीजेडी) खासदार चंद्रशेखर साहू यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गजपत्ती जिल्ह्यातील परालाखेमुंडी गावामध्ये पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रशेखर साहू यांच्यासह पक्षातील अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते. गुजपत्ती जिल्ह्याचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष संग्राम साहू हे त्यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश करण्यासाठी व्यासपीठावर गेले होते. त्यांच्या हातून पक्षाचा शेला घालण्यासाठी पुढे गेले असता चंद्रशेखर साहू यांनी सर्वांसमोरच संग्राम साहू यांच्या कानशिलात लगावली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संग्राम साहू म्हणाले, चंद्रशेखर साहू हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी माझ्या कानशिलात लगावली नाही तर केवळ गालाला स्पर्श केला. मी, विद्यार्थी असल्यापासून त्यांना ओळखत आहे. त्यांच्या उपस्थितीत 'बीजेडी' पक्षात प्रवेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Camera BJD MP Slaps Party Worker On Stage