मला 'सर' नाही तर फक्त 'राहुल' बोलाः राहुल गांधी

rahul gandhi
rahul gandhi

चेन्नईः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्टेला मैरिस कॉलेज मधील विद्यार्थ्यांची आज (बुधवार) मने जिकंली. मला 'सर' नाही तर फक्त 'राहुल' बोल, असे राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत  मनमोकळे पणाने प्रश्नांची विचारणा केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी यांनी जिन्स-टी शर्ट असा पेहराव करून विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एक विद्यार्थिनीने 'सर' म्हटल्यावर राहुल गांधी म्हणाले फक्त 'राहुल' बोला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर टाळ्यांचा कडकडाट केला. 'राहुल जी' म्हटल्यावर फक्त 'राहुल'. यामुळे विद्यार्थ्यांमधील वातावरण एकदम हलके झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱयावरील हावभाव बदलल्यानंतर राहुल गांधी यांच्याही चेहऱयावर हसू फुटले अन् पुढे प्रश्न-उत्तरांची मालिका सुरू झाली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान अशा प्रकारे तुमच्यामध्ये येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात?'

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com