Mallikarjun Kharge : अग्निवीर योजना रद्द करून भरती करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठविले. यात लष्करातील निवडीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal

नवी दिल्ली - लष्करातील तिन्ही दलांत निवड झालेल्या दोन लाख युवक-युवतींना त्वरित नियुक्तीपत्रे द्यावी आणि अग्निवीर योजना बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठविले. यात लष्करातील निवडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. लष्करात निवड झालेल्या दोन लाख युवकांना अद्यापही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. २०१९ ते २०२२ या काळात या युवकांची नियुक्ती झाली. या युवकांना लष्कर, नौदल आणि हवाईदलात निवड झाल्याचे कळविण्यात आले आहे.

यासाठी आवश्यक लेखी, मानसिक व शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा झाली आहे. या सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर नियुक्तीपत्र अद्यापही न मिळाल्याने युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेबद्दल माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही ही योजना योग्य नसल्याचे मत मांडले. लष्करात दोन प्रकारचे केडर राहिल्यास जवानांना मिळणारी सापत्न वागणुकीचे परिणाम लष्काराला भोगावे लागतील, असा इशारा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिला.

अग्निवीर योजना रद्द करून निवड झालेल्या दोन लाख युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात यावे, अशी मागणी खर्गे यांनी पत्रात केली.

जंतरमंतरवर आंदोलन

गेल्या काही वर्षांत निवड झालेल्या परंतु नियुक्तीपत्र न मिळालेले युवक जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे. या युवकांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना पायलट म्हणाले, लष्करावरील खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे केला जात आहे. परंतु यातून लष्करातील जवानांत भेदभाव स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com