'त्यागींविरोधातील सर्क्‍युलर रद्द करा'

पीटीआय
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील गैरव्यवहारप्रकरणातील सहआरोपी आणि माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्याविरोधात बजावण्यात आलेले लूकआउट सर्क्‍युलर रद्द करण्यात यावे असे निर्देश आज दिल्लीतील न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत.

विशेष न्यायाधीश अरविंदकुमार यांनी तपास यंत्रणेने या संदर्भातील आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत असे म्हटले आहे. तत्पूर्वी याप्रकरणी सीबीआयने 1 सप्टेंबर 2017 रोजी सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये त्यागी आणि ब्रिटिश नागरिक ख्रिस्तीयन मिशेल यांच्या नावांचा समावेश होता. दरम्यानच याच मिशेलने आज दिल्ली न्यायालयाचे दार ठोठावत तिहारमधील तुरुंगात स्वत:ला वेगळ्या कोठडीत ठेवण्याची मागणी केला आहे. 

Web Title: Cancel Circular against Tyagi