कर्करोगाचे प्रमाण भारतात चिंताजनक

यूएनआय
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कोलकाता - भारतात घशाच्या व मस्तकाच्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये ३० ते ४० टक्के, तर महिलांमध्ये ११ ते १६ टक्के असते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. देशात दरवर्षी दोन लाख लोकांना घशाचा व मस्तकाचा कर्करोग होतो. त्यात ८० हजार रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात, असे ‘वेस्ट बंगाल हेड अँड नेक सोसायटी’चे वरिष्ठ विश्‍वस्त डॉ. पी. एन. महोपात्रा यांनी संस्थेच्या उद्‌घाटनप्रसंगी नुकतेच सांगितले.

‘‘पुरुषांमध्ये वयाच्या ५५ वर्षांनंतर तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असले, तरी आता तरुण रुग्णही दिसत आहेत, ही बाब चिंताजनक आहे,’’ असे डॉ. महोपात्रा म्हणाले. भारतात मस्तक व घशाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असूनही या प्रकारच्या कर्करोगतज्ज्ञांचे प्रमाण केवळ २०० ते ३०० एवढेच आहे. सहा प्रमुख शहरांमध्ये ते उपलब्ध असतात, असे संस्थेचे चिटणीस डॉ. सुकृत बोस यांनी सांगितले. तंबाखू सेवन व धूम्रपानाचे व्यसन हे तोंडाचा व घशाचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरते. तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी सरकार जनजागृती व अन्य उपाय करीत असले, तरी घसा व मस्तकाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा महोपात्रा यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षण, जागृतीचा अभाव
मस्तक व घशाच्या कर्करुग्णांमधील गरिबी व अशिक्षितपणा यापेक्षा डॉक्‍टरांमध्ये जागृतीचा, प्रशिक्षणाचा अभाव व निदानाच्या साधनांची कमतरता यामुळे अशा प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते, ही अधिक गंभीर बाब असल्याचे ‘वेस्ट बंगाल हेड अँड नेक सोसायटी’च्या डॉक्‍टरांच्या पथकाने स्पष्ट केले.

Web Title: Cancer levels in India are worrisome