संरक्षणाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहू शकत नाही; संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cannot rely on others for protection

संरक्षणाच्या बाबतीत अवलंबून राहू शकत नाही; संरक्षण मंत्र्यांचे विधान

सुरक्षेच्या बाबतीत भारत जास्त काळ आयातीवर अवलंबून राहू शकत नाही. आता वेळ आली आहे की आपण केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम न राहता स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. अलीकडील संघर्षांमुळे हे स्पष्ट झाले आहे की, केवळ संरक्षण पुरवठ्यातच नव्हे तर राष्ट्रीय हितासाठी केलेल्या व्यापार सौद्यांमध्येही तणाव निर्माण होतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले. (Cannot rely on others for protection)

एअर चीफ मार्शल पीसी लाल स्मृती व्याख्यानाच्या ३७ व्या आवृत्तीत संबोधित करताना ते बोलत होते. भारत आपल्या संरक्षण गरजांसाठी मॉस्कोवर अवलंबून आहे. रशियाच्या युक्रेनशी (ukraine) युद्धामुळे भारत पाश्चिमात्य देशांसोबत तणावपूर्ण स्थितीत आला आहे. भारताने युद्धाच्या विरोधात उभे राहावे आणि रशियाचा निषेध करावा अशी पाश्चात्त्य देशांची इच्छा आहे, असे राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

हेही वाचा: पीके म्हणाले, राहुल गांधींना बोलायचे असेल तर बोलेल; परंतु, मला...

देशाच्या सुरक्षेसाठी (protection) तंत्रज्ञान आणि मानव संसाधन व्यवस्थापन विकसित करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून आपण अंतराळ मार्गदर्शित स्ट्राइक करू शकू आणि अंतराळ संपत्तीचे संरक्षण करू शकू. भविष्यात युद्धाचे स्वरूप जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. अंतराळातील लष्करी वापराच्या दिशेने आमचे विरोधक पावले उचलत आहेत. याचा आपल्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आज आवश्‍यकता आहे की, आपण उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने ओळखणे आणि त्यासाठी पूर्णपणे तयार असणे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ

सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि युक्रेनमधील (ukraine) नुकत्याच झालेल्या संघर्षाचा बारकाईने आढावा घेऊन भविष्यातील युद्धांचे स्वरूप ठरवता येईल. स्थानिक धोक्यांशी याचा संबंध जोडून सखोल समज मिळवता येते. अलीकडच्या काळात संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. महागडी शस्त्रे ही विजयाची हमी नसून, यात तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

Web Title: Cannot Rely On Others For Protection Rajnath Singh Russia Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top