
पीके म्हणाले, राहुल गांधींना बोलायचे असेल तर बोलेल; परंतु, मला...
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खूप मोठे माणूस आहेत. मी अतिशय साध्या कुटुंबातील मुलगा आहे. राहुल गांधी यांना माझ्याशी बोलायचे आहे तर मी बोलेल. मला भेटायचे नसेल तर मी त्यांना भेटू शकत नाही. काँग्रेस (congress) हा देशातील खूप मोठा पक्ष आहे. ते संविधानानुसार काम करतात. आपली काँग्रेस पक्षात कुठे चर्चा होऊ शकत नाही, असे प्रशांत किशोर (prashant kishor) काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या गैर अनुपालनाबद्दल उघडपणे बोलले.
मी संपूर्ण निर्णय घेण्यास तयार असल्याची मीडियात जी चर्चा सुरू आहे ती चुकीची आहे. सर्व निर्णय घेईल असे मी कधीच म्हटले नाही. परंतु, स्वतंत्र शाखा असलेल्या पक्षात मला अशी जबाबदारी हवी होती. काँग्रेस (congress) पक्ष हा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. तिथे संविधान चालते. तेथे बराच काळ स्वतंत्र शाखा स्थापन करून पक्षांतर्गत काम करण्याची शक्यता नाही. म्हणून मी स्वतःहून काढता पाय घेतला, असेही प्रशांत किशोर (prashant kishor) म्हणाले.
हेही वाचा: दादा राजकारणाच्या खेळपट्टीवर फटकेबाजी करणार? अमित शाह घेऊ शकतात भेट
मी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्रास देऊ शकत नाही. त्यांनी मला बोलायचे आहे असे सांगितले म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन बोललो. आता जर ते म्हणाला की माझ्याशी बोलणार नाही, तर मी त्यांना भेटू शकत नाही, असेही राहुल गांधींबाबत पीके म्हणाले. काँग्रेसच्या (congress) सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी पीकेसोबतच्या चर्चेबाबत साशंक होते आणि त्यांना पहिल्या दिवसापासूनच माहीत होते की प्रशांत किशोर (prashant kishor) पक्षात जाणार नाहीत.
Web Title: Prashant Kishor Said Rahul Gandhi Is A Big Man
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..