''ऐश्वर्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवा''

Cant Live With Her Anymore says RJD Tej Pratap Yadav
Cant Live With Her Anymore says RJD Tej Pratap Yadav

पाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले, की ''मी माझ्या पत्नीसोबत आता राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे''. 

तेजप्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलातील नेत्याची मुलगी  ऐश्वर्या रॉयसोबत विवाह केला होता. त्यांच्या या विवाहसोहळ्याला विविध राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ऐश्वर्या आणि मी एकत्र राहू शकत नाही, असे वकिलामार्फत दाखल केलेल्या अर्जामध्ये तेजप्रताप यादव यांनी सांगितले.  

याबाबत तेजप्रताप यादव यांनी सांगितले, की ''हे सत्य आहे. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आनंदी न राहता जगणे आणि दबावाच्या या जगण्याला काय फायदा नाही''. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे ही याचिका मागे घेण्यात आली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com