वाद पेटणार! सिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई?

Amarinder Singh and Sidhu
Amarinder Singh and Sidhusakal
Summary

पंजाब काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही गट माफीनाम्याप्रकरणी अडून बसले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कठोर पवित्रा घेतला असून सिद्धू यांच्याप्रकरणी शांततेत घेण्याच्या मूडमध्ये नाहीत.

चंदीगड- पंजाब काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही गट माफीनाम्याप्रकरणी अडून बसले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कठोर पवित्रा घेतला असून सिद्धू यांच्याप्रकरणी शांततेत घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यातच सिद्धू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी 62 आमदारांची उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमरिंदर काही सिद्धू समर्थक आमदारांविरोधात कारवाईच्या तयारीत आहेत. (captain amrinder singh may take action against congress mlas supporting navjot singh sidhu)

दर्शन बराड सिद्धू समर्थक आहेत. ते मोगातील बाघापुरानामधून आमदार आहेत. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, दर्शन बराड यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी होशियारपूरमध्ये सहकारी जमीनमध्ये अवैध पद्धतीने खनन करुन कोट्यवधी रुपयांचा सरकारला चूना लावला आहे. याप्रकरणी बराड यांना सप्टेंबर 2020 मध्येच खनन विभागाने नोटिस पाठवली होती आणि 1.65 कोटींचा दंड ठोठावला होता. कॅप्टन अमरिंद सिंग बराड यांची फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. सिद्धू समर्थकांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

Amarinder Singh and Sidhu
राज्यात सर्वदूर पाऊस; खरीप पिकांना दिलासा, धरणसाठ्यांत वाढ

दरम्यान, काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुवर्णमंदीराला भेट दिल्यानंतर त्यांनी घरी आमदारांना आमंत्रित केले. किमान ६२ आमदार त्यावेळी उपस्थित होते. सिद्धू यांनी ऐतिहासिक सुवर्णमंदिराला भेट दिली तेव्हा अनेक आमदार त्यांच्याबरोबर होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा विरोध झुगारून सिद्धू यांच्याकडे सूत्रे सोपविली आहेत. अमरिंदर यांची भूमिका अजूनही ताठर असून सिद्धू यांनी आपली जाहीर माफी मागावी या मागणीवरही ते ठाम आहेत.

Amarinder Singh and Sidhu
PM मोदींकडून इम्रान खान यांच्यावर पाळत? पाकिस्तानला संशय

सिद्धू यांच्या गटातील आमदारांनीच अमरिंदर यांना प्रत्यूत्तर दिले. सिद्धू यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचे अनेक आमदारांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले. सिद्धू शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंडीगड येथील काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. कार्याध्यक्ष कुलजीतसिंग नाग्रा यांनी ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com