esakal | राज्यात सर्वदूर पाऊस; खरीप पिकांना दिलासा, धरणसाठ्यांत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. खरिपातील पिकांना या पावसामुळे दिलासा मिळत असून, पिकांची वाढ जोमदारपणे सुरू आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस; खरीप पिकांना दिलासा, धरणसाठ्यांत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. खरिपातील पिकांना या पावसामुळे दिलासा मिळत असून, पिकांची वाढ जोमदारपणे सुरू आहे. कोकणात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी आंबा, काजू पिकांचे नुकसान होत आहे. (imd monsoon rain in maharashtra marathwatha vidharbha pune kokan)

कोकणात जोरदार पाऊस

गेल्या आठवड्यापासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. गुरुवारी सकाळपर्यंत पालघरमधील जव्हार ११७, मोखेडा १०६.२, विक्रमगड १३०, वाडा ११४ मिलिमीटर पाऊस पडला. रायगडगमधील माथेरानमध्ये ११३.५ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीमधील राजापूर १३५, रत्नागिरी ११२.९, संगमेश्‍वर १५७,जयगड १४५, चिपळूण १०४ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील वैभववाडीत १५७ मिलिमीटर, ठाण्यातील शहापूर येथे १०६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यापावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव व कोकणातील धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचा आज संसदेवर एल्गार; पोलिसांकडून अटींचा मारा

मध्य महाराष्ट्रात संततधार

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सातारा, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. पूर्व भागातही पावसाची काहीशी संततधार सुरू होती. साताऱ्यातील महाबळेश्‍वर १६४, कोल्हापुरातील गगनबावडा १४९ मिलिमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळाली. खानदेशात पावसाचा जोर नसला तरी काही ठिकाणी शिवकावा झाला. नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे सुकत असलेल्या पिकांना काहीसा आधार मिळाला.

हेही वाचा: Pegasus Row: थरुर यांची संसदीय समिती करणार अधिकाऱ्यांची चौकशी

मराठवाडा, विदर्भात हलक्या सरी

मराठवाड्यात व विदर्भात मागील दोन ते तीन दिवस पावसाने काहीशी उसंत दिली होती. मात्र मंगळपासून पुन्हा पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद पावसाचा जोर अधिक असला तरी हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. या पावसामुळे शेतातील काही प्रमाणात कामे खोळंबली होती. विदर्भातही अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती.

loading image
go to top