esakal | पंतप्रधान मोदींकडून इम्रान खान यांच्यावर पाळत? पाकिस्तानला संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan says PM Narendra Modi

भारताने २०१९ मध्ये पाळत ठेवण्यासाठीचे संभाव्य लक्ष्य म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची निवड केली होती, अशी माहिती ‘द गार्डियन’ने दिली आहे.

PM मोदींकडून इम्रान खान यांच्यावर पाळत? पाकिस्तानला संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोस्टन- ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता अशी पाळत ठेवण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींच्या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह 14 देशांच्या राष्ट्रप्रमुखांचाही समावेश असल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने म्हटले आहे.(pegasus spyware keeping eye on Imran Khan Pakistani leaders have doubts on PM narendra Modi )

भारताने २०१९ मध्ये पाळत ठेवण्यासाठीचे संभाव्य लक्ष्य म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची निवड केली होती, अशी माहिती ‘द गार्डियन’ने दिली आहे. याबाबत दोन्ही देशांच्या सरकारांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, दुसऱ्या देशातील व्यक्तींची माहिती मिळविण्यासाठीचे काही प्रोटोकॉल निश्‍चित असून केवळ राष्ट्रहितासाठी आणि अत्यंत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच असे करता येते, असे उत्तर भारताने पूर्वी दिले आहे. इम्रान यांचे नाव यादीत आढळल्याने पाकिस्तानच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचा आज संसदेवर एल्गार; पोलिसांकडून अटींचा मारा

माहिती आणि प्रसारण मंत्री फारूख हबीब यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही यामध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘पेगॅसस’चा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांची माहिती मिळविण्यासाठी शरीफ यांनी नरेंद्र मोदींची मदत घेतली असावी, असे हबीब यांनी म्हटल्याचे वृत्त ‘द डॉन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. शरीफ अणि मोदी यांच्यात चांगले संबंध असल्याने असे शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

इस्राईलमधील एनएसओ ग्रुप या कंपनीने तयार केलेल्या ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचे प्रकरण फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीज्‌ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी उघडकीस आणले होते. त्यांच्या हाती पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य असलेल्या ५० हजार मोबाईल क्रमांकांची यादी हाती लागली होती. ‘पेगॅसस’ची विक्री केवळ देशाच्या सरकारांनाच केली असल्याचा ‘एनएसओ ग्रुप’चा दावा असला तरी आता राष्ट्रप्रमुखांचेच क्रमांक या यादीत आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या नेत्यांवर खरोखरच पाळत ठेवली गेली होती का, हे समजू शकलेले नाही कारण त्यांच्यापैकी कोणीही त्यांचा स्मार्टफोन चाचणीसाठी दिला नाही.

हेही वाचा: राज्यात सर्वदूर पाऊस; खरीप पिकांना दिलासा, धरणसाठ्यांत वाढ

राजघराण्यावरही पाळत

अझरबैजान, कझाखस्तान, पाकिस्तान, मोरोक्को आणि रवांडा या देशांमधील व्यक्तींवरही पाळत ठेवली गेल्याचा संशय आहे. शिवाय अरब देशांमधील राजघराण्यातील अनेक व्यक्तींचे मोबाईल क्रमांकही यादीत आहेत. एनएसओ ग्रुपने मात्र मॅक्रॉन किंवा इतर राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’चा वापर झाल्याचा इन्कार केला आहे.

या नेत्यांवरही लक्ष्य

इमॅन्युएल मॅक्रॉन (अध्यक्ष, फ्रान्स), सिरील रामाफोसा (अध्यक्ष, दक्षिण आफ्रिका), बऱ्हाम सालिह (अध्यक्ष, इराक), राजे महंमद सहावे (मोरोक्को), इम्रान खान (पंतप्रधान, पाकिस्तान), मुस्तफा मदबौली (पंतप्रधान, इजिप्त), साद एदीनी एल ओथमानी (पंतप्रधान, मोरोक्को)

loading image