धक्कादायक! जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये 20 किलो स्फोटके ठेवलेली कार आढळली

पीटीआय
Thursday, 28 May 2020

जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांना 20 आईईडी स्फोटकं ठेवलेली कार सापडल्याने खळबळ उडाली आहे. मोठा बॉम्ब हल्ला होण्याच्या आधीच जवानांनी कार पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, कारचा ड्राईव्हर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पुलवामा - जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांना 20 आईईडी स्फोटकं ठेवलेली कार सापडल्याने खळबळ उडाली आहे. मोठा बॉम्ब हल्ला होण्याच्या आधीच जवानांनी कार पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, कारचा ड्राईव्हर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुलवामा पोलिसांना एका कारमध्ये विस्फोटक ठेवण्यात आल्याची माहिती 4-5 दिवसांपूर्वी मिळाली होती. तसेच गजबजलेल्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांची योजना असल्याचंही पोलिसांना कळालं होतं. त्यानुसार पोलिसांनी सक्रिय होत काही गट तयार केले. पुलवामा पोलिस आणि सीआरपीएफ जवान सर्व मार्गांवर लक्ष ठेवून होते. यावेळी त्यांनी एका सँट्रो कारला थांबण्याचा इशारा केला तेव्हा कारचा ड्राईव्हर पळून गेला. कारची तपासणी केले असता एका ड्रममध्ये 20 किलो स्फोटके आढळली.

मुंबई, पुण्याची सुटका नाहीच; संसर्ग वाढल्याने प्रशासन दक्ष

सुरक्षा दलांनी त्वरीत आजूबाजूचा परिसर रिकामा केला व बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आयईडी स्फोटक यशस्वीरित्या निष्क्रिय करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठा धोका टळला आहे. 

पीपीई किटच्या खरेदीत झाला भ्रष्टाचार; भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

पुलवामा पोलिस, सीआरपीएफ जवान आणि सुरक्षा दलांच्या मदतीने मोठी घटना टळली आहे. वेळेवर मिळालेले माहिती आणि योग्य वेळेवर केलेल्या हालचाली यामुळे हे शक्य झाल्याचं काश्मिरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पुलवामा येथे सीआरपीएफ जवान आणि काश्मिर पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 2 जवान गंभीर जखमी झाले होते. परिसराची निगरानी करताना ही घटना घडली होती. त्यानंतर आता कारमध्ये स्फोटकं सापडल्याने दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A car loaded with 20 kg of explosives was found in Pulwama Jammu and Kashmir