New IAF Ensign : भारतीय नौदलानंतर वायुदलाने देखील बदलला ध्वज; जाणून घ्या काय आहे खासियत

 New IAF Ensign
New IAF Ensign

भारतीय हवाई दल दिवसाच्या निमीत्ताने आज भारतीय हवाई दलाला नवीन ध्वज मिळाला आहे. आज हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी प्रयागराज येथे वार्षिक परेडदरम्यान या नवीन ध्वजाचे अनावरण केले. भारतीय एअर फोर्सने इंग्रजांच्या काळातील झेंड्याचा त्याग करत आपल्या ध्वजामध्ये बदल केला आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय हवाई दलाची अधिकृतरित्या ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९४५ साली हवाई दलाच्या दर्जेदार कामगिरीमुळे हवाई दलाच्या नावात रॉयल शब्द जोडून सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल हे 'रॉयल इंडियन एअरफोर्स' म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये हवाई दलाने आपल्या नावातील 'रॉयल' हा शब्द काढून टाकला. तसेच हवाई दलाचा झेंडा देखील बदलण्यात आला.

 New IAF Ensign
Israel Palestine Conflict : लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना मागे कोसळलं इस्त्रायली क्षेपणास्त्र; व्हिडिओ होतोय व्हायरल

आरआयएएफ ध्वजामध्ये वरील डाव्या कँटनमध्ये यूनियन जॅक आणि फ्लाय साइडवर आरआयएएफ राउंडेल (लाल, पांढरा आणि निळा) याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचा ध्वजामध्ये खालच्या उजव्या कँटनमध्ये यूनियन जॅकची जागा भारतीय तिरंग्याने घेतली आणि आरएएफ राउंडल्सएवजी तेथे तिरंग्याचे राउंडेल देण्यात आले.

भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची मुल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे.तसेच ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे.

 New IAF Ensign
Israel Iron Dome : इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाकडून आज ९१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. तसेच त्यांच्या हस्ते परेडमध्ये हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यासाठी हवाई दलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला. आता हा ध्वज वायुसेना संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com