काळा पैसा बदलणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यावर गुन्हा

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

गुरगाव (हरियाना) : गुरगाव पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या 10 लाख 96 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरू होता. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुरगाव पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 10.96 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरु होता. त्यामध्ये सनी खंडुजा नावाचा व्यावसायिक आणि त्याच्या दोन सहायकांसह एचडीएफसी बॅंकेतील रोखपाल सुकांत अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. हे सर्व जण जुन्या नोटा बदलण्याचे काम करत होते. त्यामध्ये सुकांतही मदत करत होता. सुकांत हा गुरगावमधील एचडीएफसी बॅंकेच्या डीएलएफ फेज-2 येथील शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहिम उघडली आहे.

दरम्यान, नवी दिल्ली पोलिस आणि प्राप्तीकर विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका वकिलाच्या कार्यालयात अंदाजे 13.50 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 2.61 कोटी रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश आहे.

Web Title: Case against HDFC cashier for converting black money