पुरावा दिल्यासच हुंड्यासाठी खुनाचा खटला

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : हुंड्यासाठी क्रूरतेने हत्या केल्याचा कोणताही योग्य पुरावा दिल्यास आरोपीच्या विरुद्ध हेतुपुरस्सर खून केल्याचा खटला चालविला जाईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

लग्नाला सात वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच पीडित महिलेचा मृत्यू झाला तर तिची हत्या केल्याचे मानण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्या. अमितत्वा रॉय यांच्या खंडपीठाने दिला आहे.

महिलेचा हुंड्यासाठी छळ करून तिची हत्या केल्याबद्दल पुरावा देऊ शकले नाहीत, तर संबंधित आरोपीला याप्रकरणी दोषी धरता येणार नाही, असे मत या खंडपीठाने व्यक्त केले आहे. एखाद्या महिलेची हत्या ही हुंड्यासाठीच झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देणे गरजेचे आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.

Web Title: case of murder for dowry will stand only after proof