बागेश्वर धामचे महाराज अडकले कायद्याच्या कचाट्यात; धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल I Bageshwar Dham | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham Dhirendra Shastri

उदयपूर इथं गुरुवारी झालेल्या धर्मसभेत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी राजसमंदचा कुंभलगड किल्ला भगवा करण्याचा आदेश दिला.

Bageshwar Dham : बागेश्वर धामचे महाराज अडकले कायद्याच्या कचाट्यात; धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल

उदयपूर : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्यावर उदयपूरमधील समुदायांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयपूर पोलिसांनी हाथीपोल पोलीस ठाण्यात (Hathipole Police Station) पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात कलम 153-ए अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

राजसमंदमधील कुंभलगडचं नाव घेऊन धीरेंद्र शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर काही तरुणांनी कुंभलगड किल्ला गाठून गोंधळ घातला. उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांनी सांगितलं की, बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंडित धीरेंद्र शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शास्त्रींच्या वक्तव्यात समुदायांमध्ये तेढ वाढवणारे शब्द वापरले गेले.

त्यानंतर कुंभलगडमध्ये काही तरुणांनी दुष्कृत्य केलं. तद्नंतर केलवाडा पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली. सध्या शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

पाच तरुणांना अटक

उदयपूर इथं गुरुवारी झालेल्या धर्मसभेत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी राजसमंदचा कुंभलगड किल्ला भगवा करण्याचा आदेश दिला. त्यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे काही तरुण कुंभलगड किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी तिथं पोहोचले. त्यांनी तिथं भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस वेळेत तिथं पोहोचल्यानं त्या तरुणांना त्यात यश आलं नाही. पोलिसांनी तेथून पाच तरुणांना अटक केली आहे.

टॅग्स :RajasthanCrime News