Madrasa : मदरशात 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग; 52 वर्षाच्या मौलवीविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh Crime News

'आरोपीनं तिचा उजवा हात पकडला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केलं.'

Madrasa : मदरशात 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग; 52 वर्षाच्या मौलवीविरोधात गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील इंदूर (Madhya Pradesh Indore) शहरामधील एका मदरशाच्या 52 वर्षीय मौलवीवर 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

चंदननगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय नेमा यांनी सांगितलं की, 'पोलिसांनी शुक्रवारी मदरशाच्या मौलवीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचं संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. मौलवीच्या दोन मुलांवरही पीडितेच्या वडील आणि काकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.'

हेही वाचा: मुसलमान सर्वात जास्त कंडोम वापरतात, लोकसंख्या कुठं वाढतेय? ओवैसींचा भागवतांना थेट सवाल

अभय नेमा यांनी पीडितेच्या तक्रारीचा हवाला देत म्हटलं की, 'मुलीनं सप्टेंबरमध्ये मदरशात प्रवेश घेतला होता आणि शिक्षण घेत असताना आरोपी मौलवीनं तिला एका बंद खोलीत नेलं आणि तिथं तिचा विनयभंग केला. या आठवड्याच्या सुरुवातीला पीडिता वर्ग संपल्यानंतर इतर विद्यार्थ्यांसह मदरशातून बाहेर पडत असताना आरोपीनं तिचा उजवा हात पकडला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केलं.'

हेही वाचा: Congress : काँग्रेस आमदारावर भ्याड हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, हल्ल्यानंतर वाहनांची तोडफोड

पीडितेच्या वडिलांवर लोखंडी रॉडनं हल्ला

मुलीनं नंतर तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे वडील त्यांच्या इतर दोन नातेवाईकांसह मौलवीच्या घरी पोहोचले. तेव्हा मौलवीच्या मुलांनी मुलीच्या वडिलांवर आणि तिच्या काकांवर लोखंडी रॉडनं हल्ला करून त्यांना जखमी केलं, असं नेमा यांनी स्पष्ट केलं.