आयएएस अधिकाऱ्यांसह सोळा जणांविरोधात गुन्हा

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पाटणा : बिहारमधील अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी आयएएस अधिकारी एस. एम. राजू यांच्यासह सोळा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विद्यार्थी कल्याण विभागामध्ये सचिव असताना अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या महादलित आणि आदिसी समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती.

अन्वेषण विभागाने चार वर्षांपूर्वीच या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली होती. "गोन्ना इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी अँड सायन्स' या संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक असून अनेक शैक्षणिक संस्थांचा देखील त्यामध्ये वाटा आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या नावे बनावट खाती काढून त्यांच्या नाव पैसे उचलण्याचा प्रकार या मंडळींनी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या अन्य सोळा मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांनी यात मध्यस्थांची भूमिका पार पाडून पैसे लाटल्याचे उघड झाले आहे.

Web Title: cases against ias officers in scholarship scam