
देशात जात निहाय जनगणना होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस, राजद, सपा यांसह इतर पक्षांकडून देशात जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. आता केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान, आता असा प्रश्न उपस्थित होतोय की जातनिहाय जनगणना कशासाठी केली जाणार आहे? यामुळे कुणाला फायदा होईल आणि कुणाला नुकसान होऊ शकतं?