बाजारात विषारी सॅनिटायझर, CBI ने केला मोठा खुलासा

sanitizer
sanitizer
Updated on

नवी दिल्ली - सीबीआयला इंटरपोलने दिलेल्या माहितीनंतर देशातील पोलिस आणि कायदा सुव्यवस्था लागू कऱणाऱ्या सर्व यंत्रणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांकडून विषारी मिथेनॉलचा वापर करून हँड सॅनिटायझर विक्री केली जात आहे. यासाठी आणखी एक गट कार्यरत असून तो पीपीई किट आणि कोरोनाशी संबंधित साहित्य मेडिकलमध्ये पुरवत असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने तातडीने पोलिस अधिकाऱ्यांना सावध केलं असून कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारी जगत कोरोनाच्या या परिस्थितीचा फायदा घेत आहे. इंटरपोलचं मुख्यालय लॉयनमध्ये आहे. त्याच्याशी समन्वय साधण्याचं काम सीबीआयकडे आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या कचाट्यात जग सापडलं आहे आणि अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. यातच गुन्हेगारी संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रीय झाल्या असून अनेक अवैध धंद्यातून पैसे कमवत आहेत. कोरोनाशी लढ्यात आवश्यक असलेल्या साधनांचा पुरवठा कऱणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी बनून गुन्हेगारी जगताने लुट सुरू केली आहे. 

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुन्हेगार हे पीपीई किट आणि कोरोनाशी संबंधित इतर उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी झाले आहेत. ते रुग्णालय आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करत आहेत. सध्या बाजारातील साहित्याच्या तुटवड्याचा फायदा घेत अधिकाऱी आणि रुग्णालयांकडून ऑनलाइन ऑर्डर घेतात पण पैसे मिळाल्यानंतर साहित्य देत नाहीत. 

इंटरपोलने अशा माहिती दिली की, मिथेनॉलचा वापर करून बनावट हँड सॅनिटायझर तयार केलं जात आहे. मिथेनॉल हे विषारी केमिकल आहे. कोरोनाच्या काळात विषारी हँड सॅनिटायझरच्या वापराबाबत इतर देशांकडूनही माहिती मिळाली आहे. मिथेनॉल इतकं विषारी असतं की मानवी शरीरासाठी ते धोकादायक ठरू शकतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com