लाच घेताना प्राप्तिकर अधिकाऱ्याला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

विशाखापट्टनम : प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याला तीस हजार रुपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

बी श्रीनिवास राव असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला तीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. एका स्थावर मालमत्तेच्या विक्रीप्रकरणात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आणि कार्यालयीन प्रक्रिया डावलून मालमत्ता विक्री करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच रावने मागितली होती. मात्र एवढी रक्कम एकरकमी देता येत नसल्याने टप्याटप्याने रक्कम देण्याचे ठरले होते. त्यापैकी तीस हजार रुपयांचा पहिला हप्ता मंगळवारी देण्यात येत होता. याच वेळी रावला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, राव याच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी केलेल्या तपासणीत 2 लाख 3 हजार370 रुपयांसह काही कागदपत्रे सापडली आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलिकडेच अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्तांकडून 30 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.

Web Title: CBI arrests Income Tax officer for accepting bribe