त्यागींच्या जामिनाला सीबीआयकडून आव्हान

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

या याचिकेवर 9 जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आज दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले. जामिनावर मुक्त असलेले त्यागी हे तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, असा दावा "सीबीआय'ने केला आहे.

 

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहार प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांना न्यायालयाने 26 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यागी यांच्या जामिनाला "सीबीआय'ने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

या याचिकेवर 9 जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आज दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले. जामिनावर मुक्त असलेले त्यागी हे तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, असा दावा "सीबीआय'ने केला आहे. या प्रकरणी "सीबीआय'ने त्यागींना 9 डिसेंबर रोजी अटक केले होते.

Web Title: CBI challenges bail given to Tyagi