राबडी देवींची सीबीआय चौकशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

नोटबंदीच्या काळात सहकारी बॅंकेत दहा लाख रुपये जमा करण्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले.

पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटूंबामागील ससेमिरा थांबण्याचे नाव घ्यालया तयार नाही. नोटबंदीच्या काळात सहकारी बॅंकेत दहा लाख रुपये जमा करण्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले. मागील दिड वर्षापासून या सहकारी बॅंकेची सीबीआय चौकशी सुरू आहे.  

अनेक खोट्या खातेदारांच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केल्याच्या आरोपावरून या बॅंकेची चौकशी सुरू आहे. याआधी राष्ट्रीय जनता दलाचे माजी विधान परिषद सदस्य अनवर महमद यांच्या मुलाला या प्रकरणात अटकही करण्यात आले होते.  

Web Title: cbi enquiry for rabri devi