Facebook डाटा चोरीप्रकरणी Cambridge Analytica ला घडणार अद्दल; CBIने दाखल केला गुन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

केंद्रीय तपास एजेंसी CBI ने यूकेची कंपनी कँब्रिज एनालिटिका (Cambridge Analytica) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय तपास एजेंसी CBI ने यूकेची कंपनी कँब्रिज एनालिटिका (Cambridge Analytica) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 5.62 कोटी भारतीय फेसबुक यूझर्संचा डाटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कँब्रिज एनालिटिकाने बेकायदेशीररित्या भारतातील फेसबुक युझर्संचा डाटा गहाळ केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कँब्रिज एनालिटिका आणि ग्लोबल साईन्स रिसर्चविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीबीआयने या दोन कंपन्यांविरोधात 2018 पासून प्राथमिक तपास सुरु केला होता. कँब्रिज एनालिटिकाने ग्लोबल साईन्स रिसर्च कडून अवैध कारणासाठी खासगी डाटा घेतल्याचा आरोप आहे.  

धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार

मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक कंपनीने सांगितलं होतं की, 8.7 कोटी लोकांचा विशेषकरुन यूकेमधील यूझर्सचा डाटा अयोग्यरित्या कँब्रिज एनालिटिकासोबत शेअर करण्यात आला आहे. डाटा शेअरिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुक आणि कँब्रिज एनालिटिकाला 2018 मध्ये याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं. अखेर सीबीआयने कँब्रिज एनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI files case against Cambridge Analytica Facebook