मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ देश सोडण्यावर CBI ने घातली बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aap

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ देश सोडण्यावर CBI ने घातली बंदी

दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले आहे. सीबीआयने ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे अशा आरोपींची नावे या परिपत्रकात आहेत. मात्र, यामध्ये मुंबईच्या एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा उल्लेख नाही.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, केंद्र सरकार दिल्लीत शिक्षण क्षेत्रात केलेल्या मोठ्या कामाला ब्रेक लावू इच्छित आहे, त्यामुळेच मला 2-4 दिवसांत अटक होऊ शकते. दरम्यान, सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ जणांविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. हे लूकआउट परिपत्रक सिसोदिया यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण आता हे लोक देश सोडून जाऊ शकणार नाहीत आणि त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना ताब्यातही घेतले जाऊ शकते.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले

"माना कि धीरे धीरे तो, मौसम भी बदलते रहते हैं, आपकी रफ़्तार से तो, हवाएं भी हैरान हैं साहब."

नोटीस मध्ये नाही विजय नायर यांच नाव

सीबीआयने जाहीर केलेल्या एका पत्रकात मुंबई मधील एन्टरटेन्मेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीओ विजय नायर यांचं नाव त्यात नव्हत. शनिवारी नायर यांनी सांगितलं की मी देश सोडून गेली नाही.माझ्या खाजगी कामा साठी बाहेर आलोय.

घोटाळ्या वर कपिल मिश्रा घेणार जाहीर सभा

दिल्लीत झालेल्या दारू घोटाळ्यावर भाजप नेते कपिल मिश्रा हे आदमी पक्षावर आणि अरविंद केजरीवाल यांच्या वर टीका करत आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे की दिल्लीत झालेल्या घोटाळ्यामुळे मी दिल्लीत 100 जाहीर सभा घेणार आहे.दिल्लीत घोटाळा करणाऱ्या केजरीवाल टोळीला माफ नाही करणार

Web Title: Cbi Issued Circular Notice Against Deputy Cm Manish Sisodia 13 Delhi Liquor Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Arvind KejriwalCBI