'चौकीदारच चोर' नावाचा थ्रिलर : राहुल 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या निमित्ताने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार करताना "दिल्लीमध्ये चौकीदारच चोर असल्याचा क्राइम थ्रिलर सुरू असून, लोकशाही टाहो फोडते आहे', असा टोला लगावला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आक्रमक ट्विट करून पंतप्रधान मोदींना तसेच केंद्रातील मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. या ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे, की दिल्लीत "चौकीदारच चोर' या नावाचा क्राइम थ्रिलर सुरू आहे. याच्या नव्या भागामध्ये सीबीआयच्या उपसंचालकांद्वारे एक मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, कायदा सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दुसरीकडे गुजरातमधून आणलेला (चौकीदाराचा) साथीदार कोट्यवधी रुपयांची वसुली करतो आहे. अधिकारी थकले आहेत. भरवसा उरलेला नाही. लोकशाही टाहो फोडते आहे, असाही चिमटा राहुल यांनी काढला आहे. 

सीबीआयचे उपसंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रीय मंत्री हरीभाई चौधरी यांनी लाच घेतल्याचा आणि दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, कायदा सचिवांवर तपास कामात दबाव आणल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस पक्षाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. उच्चपदस्थांवरील आरोप पाहता कायद्याच्या संरक्षणासाठी न्यायालयानेच पुढाकार घेण्याचा कॉंग्रेसचा आग्रह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com