पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश

पीटीआय
सोमवार, 29 जून 2020

तुतीकोरीन जिल्ह्यातील संतनाकुलममध्ये झालेल्या पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी तमिळनाडू सरकारला सीबीआय चौकशीचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे.

चेन्नई- तुतीकोरीन जिल्ह्यातील संतनाकुलममध्ये झालेल्या पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी तमिळनाडू सरकारला सीबीआय चौकशीचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणात न्यायालयीन कारवाईपेक्षा सरकारने योग्य पावले उचलावीत, असे मतही व्यक्त केले आहे. दरम्यान, निःपक्ष चौकशीसाठी संतनाकुलमच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उप-अधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश देण्यात आला आहे. 

या संदर्भात, सीबीआय चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दिली. मात्र, योग्य चौकशी आणि कारवाई महत्त्वाची असून सीबीआय चौकशीसाठी परवानगी मागण्याचीही गरज नव्हती, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

भारताचा चीनला दणका; टिकटॉकसह 59 चिनी ऍप्सवर बंदी, वाचा यादी!
पोलिसांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाने पिता-पुत्राचा कोठडीत मृत्यू झाला होता. पी. जयराज (वय 60) आणि जे. बेनिक्‍स (वय 31) या दोघांना संतनाकुलम पोलिसांनी 19 जून रोजी लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक केली होती. या दोघांच्या नातेवाइकांनी दावा केला होता, की पोलिसांनी जयराजला मोबाईल दुकानातून ताब्यात घेऊन मारहाण केली होती. त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या बेनिक्‍सलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून, सथनाकुलमच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश दिला आहे. प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, पिता-पुत्राच्या शवविच्छेदनाचा अहवालही उद्या (ता. 30) सादर करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण शवविच्छदन प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आणि त्यांचा न्यायालयावर विश्‍वास असल्याचे सांगितले. दोषी पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एक पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांच्याशिवाय अन्य पाच युवकांनी पिता-पुत्रास अतिशय निर्दयीपणे मारहाण केल्याचे सांगितले जाते. 

आता ठरलं! राफेल विमानांची डिलिव्हरी लवकरच होणार
राजकीय नेत्यांची टीका 

पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी याचिका दाखल केल्यानंतर सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र, तमिळनाडू कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आलगिरी यांनी या निर्णयावर टीका केली आहे. "एमएनएम' नेते, अभिनेता कमल हासन यांनीही सीबीआय चौकशीला विलंब होऊ शकतो, असे म्हटले आहे. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI probe into father son death